महाविकास आघाडी सरकार विरोधात कोल्हापुरात रास्ता रोको 

kolhapur bjp protest against maharashtra government
kolhapur bjp protest against maharashtra government
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंग, लूट अशा घटना घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ आज माळकर तिकटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. निष्क्रिय सरकारचा निषेध नोंदवला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राउत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. 

पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. गायत्री राऊत म्हणाल्या, ""महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. कोविड सेंटर, हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरुच आहे. मुख्यमंत्री यांना पत्र, ई-मेल, विविध समाज माध्यमातून निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. महिला आयोगासाठी आठ महिने महाविकास आघाडी सरकारने अध्यक्ष नेमला नाही आहे.'' नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, संगीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. चिकोडे म्हणाले, ""उत्तर प्रदेशातील हथरस येथील प्रकार निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्या घटनेचा निषेध महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री करतात; पण महाराष्ट्रात कोविड सेंटरमध्ये महिलांवरील होणा-या अत्याचाराबद्दल एक शब्दही उच्चारत नाहीत. जंबो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, डॉक्‍टरांची होणारी अवहेलना यासह हे सरकार अपयशी ठरले आहे.'' संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव यांनी निषेध व्यक्त केला. 

 पोलीस प्रशासनाने आंदोलक कर्त्यांना अटक केली. सरचिणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, भारती जोशी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, को.म.न.पा विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भाग्यश्री शेटके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com